

नाशिक : प्रशासन अधिक कार्यक्षम व नागरिककेंद्री करण्यासाठी सर्व शासकीय विभागांचा सहभाग महत्वाचा असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विभाग प्रमुखांचा दिल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही काळाची गरज आहे. वेळबद्ध व नियमाधारीत प्रशासनाचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. नागरिकांच्या सोयीसुविधा व शासनसेवा घेताना येणारा अनुभव चांगला करण्यावर भर द्यावा. तहसील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एकात्मिक ई-ऑफिस प्रणाली वापरत फाईल हालचाल सुलभ करावी.
चेकलिस्ट पद्धतीचा वापर केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना फाईल तपासणी व निर्णय प्रक्रिया अधिक जलद व अचूक करता येईल, असे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी निश्चित केलेली १२४ उद्दिष्टे महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी पूर्ण करावे. अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांच्या कामगिरीचा अभ्यास करावा, कमी कामगिरी करणाऱ्या यंत्रणांची माहिती घेत त्यांना मार्गदर्शन व सहाय्य द्यावे. १५ दिवसात पुनरावृत्ती स्वरुपाचे आढावे घ्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, कुंदन हिरे उपस्थित होते.