Nashik Road Central Jail | नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील स्वयंपाकगृहाचा कायापालट; 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Nashik Road Central Jail | सर्व बंदींची महिनाभरात वैद्यकीय तपासणी : जिल्हाधिकारी प्रसाद यांनी घेतला सुविधांचा आढावा
Nashik Road Central Jail
Nashik Road Central Jail
Published on: 
Updated on: 

नाशिक / देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील स्वयंपाकगृहाच्या सुधारणांसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच, सर्व बंदींची वार्षिक वैद्यकीय तपासणी येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

Nashik Road Central Jail
Kalika Mata Yatra | नाशिक कालिकामाता नवरात्र उत्सव: रहाटपाळण्याच्या जागेचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात!

कारागृहातील आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी (दि. २८) नाशिक मध्यवर्ती कारागृहास भेट देत विविध व्यवस्थांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कारागृहातील रुग्णाल्याची पाहणी करून बंदींच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच महिला बंदी कक्ष, तृतीयपंथी बंदी कक्ष, स्वच्छतागृहे, कपडे धुण्याची सुविधा तसेच न्यायालयीन सुनावणीसाठी उपलब्ध व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधेचीही पाहणी केली.

तसेच कारागृहातील स्वयंपाकगृहाची पाहणी करताना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. स्वयंपाकगृहातील आवश्यक सुधारणा व दुरुस्तीसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत कारवाई तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


यावेळी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत उपस्थित होते. बंदींच्या आरोग्य, सुरक्षितता आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने कारागृहातील सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करून व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी भर दिला.

Nashik Road Central Jail
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपात प्रशासकीय फेरबदल! प्रदीप चौधरींना मुदतवाढ, तर नीलेश भदाणेंची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

फरार बंदींची माहिती द्या:

पॅरोलवर सुटून निर्धारित मुदतीनंतर कारागृहात परत न आलेले तसेच कारागृहातून फरार झालेले बंदी यांची अद्ययावत यादी पोलिस विभागाला नियमितपणे उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कारागृह प्रशासन आणि पोलिस विभागामध्ये आवश्यक समन्वय ठेवून अशा प्रकरणांमध्ये प्रभावी कारवाई करण्यावरही त्यांनी भर दिला.

तसेच सामान्य रुग्णालय, नाशिक येथील प्रिसन वॉर्डची आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. संचित पॅरोल रजेसाठी पोलिस अहवाल त्वरित उपलब्ध करून देण्याबरोबरच बंदींना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविताना आवश्यक पोलिस गार्ड उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news