Nashik City Police | पोलीस अंमलदार 'एफबी लाईव्ह'

पोलिसांच्याच कार्यपद्धतीबद्दल काढले वाभाडे बाहेर
social media
social mediapudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या एका पथकातील अंमलदाराने सोमवारी (दि. १६) केलेला फेसबुक लाइव्ह चर्चेचा विषय ठरला. खात्यांतर्गत चौकशीमुळे त्रस्त झाल्याचा दावा करून या अंमलदाराने पोलिसांच्याच कार्यपद्धतीबद्दल फेसबुक लाईव्ह केले. अंमलदाराने व्हिडिओत केलेले दावे आयुक्तालयाने फेटाळले असून, हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने पोलिस दलातही चर्चा सुरू आहे. (The police officer's Facebook live became a topic of discussion)

शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सुमारे वर्षभरापूर्वी एका महिलेने संबंधित अंमलदाराविरोधात तक्रार केली. सोशल मीडियावरून अंमलदाराने शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेने केला. त्यामुळे या अंमलदाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीनंतर संबंधित अंमलदाराविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, सोमवारी (दि. १६) या अंमलदाराने फेसबुक लाईव्ह करीत चार-पाच दिवसांपूर्वी अपघात झाल्याने चेहऱ्याला दुखापत झाल्याचे सांगितले. तसेच ‘पोलिस विभाग एका बाजूनेच चौकशी करतात. मुद्दे नेमके कुठे मांडू, माझे बरे-वाईट झाल्यास काय?, तणावामुळे बरे वाईट होईल’ असे लाईव्हमध्ये तो बोलला. हा व्हिडिओ दिवसभर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय बनला. आयुक्तालयास ही माहिती मिळाल्यानंतर अंमलदाराची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याने अंमलदाराविरोधात कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news