Viral Fever Cases | ऐन सणासुदीच्या काळात नाशिककर तापाने फणफणले; एका महिन्यात 8,780 जणांना आजाराची लागण

Viral Fever Cases | महिनात ८,७८० जणांना आजाराची लागण; रुग्णसंख्या ६७ हजारांवर
Fever
FeverPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऐन सणासुदीच्या काळात बदलते वातावरण नाशिककरांना 'ताप'दायक ठरले आहे. शहरात तापसदृश आजाराची सात् पसरली असून, गेल्या महिनाभरात ८,७८० जणांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः, गेल्या १० महिन्यांतच या आजाराच्या रुग्णांची संख्या ६५,७८० वर पोहोचल्याने घराघरांट या आजाराचे रुग्ण असण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Fever
Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

सुरुवातीला जोर धरलेल्या पावसाने परतीच्या काळात दडी मारल्याने 'ऑक्टोबर हीट'ने नाशिककर पुरेط हैरान झाले आहेत. दिवसाच नाही, तर रात्रीच्या वेळीदेखील जाणवणारा उकाडा असह्य झाल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागले.

एकीकडे स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांची साथ नाशिककरांना त्रासदायक ठरत असताना, तापसदृश आजाराने घातलेले थैमान नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर करणारे ठरले आहे. ऑक्टोबर महिनाभरात तापसदृश आजाराच्या ८,७८० रुग्णांची नोंद झाली.

जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या १० महिन्यांच्या कालखंडात तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या ६५ हजार ७८० इतकी झाली आहे. थंडी-ताप, अंगदुखी, डोकेदुखी, पाय दुःखे यांसारखी आजाराची लक्षणे आहेत.

ही रुग्णसंख्या केवळ महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, शहरी आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आहे. मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याने या आजाराची लागण नाशिककरांसाठी जीवघेणी ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डेंग्यूचा डंखही वाढला

एकीकडे तापसदृश आजाराचा प्रादुर्भाव शहरात वाढत असताना, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या कीटकांजन्य आजारांची लागणदेखील शहरात मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या जानेवारी ते सप्टेंबर या गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात १८४ जणांना डेंग्यूची लागण झाली होती.

त्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ होऊन महिनाभरात तब्बल १३९ डेंग्यू रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरात गेल्या १० महिन्यांतील डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा ३२१ वर पोहोचला.

स्वाइन फ्लूचा जोर ओसरला

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असताना सुदैवाने स्वाइन फ्लूसारख्या जीवघेण्या आजाराचा जोर मात्र ओसरला. शहरात जानेवारी ते जुलैदरम्यान स्वाइन फ्लूचे २८ रुग्ण होते. ऑगस्टमध्ये पावसाळ्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या महिन्यात १९१ रुग्ण वाढले, तर सप्टेंबरमध्ये १८३ नवे रुग्ण आढळले होते. ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला. ऑक्टोबर महिन्यात या आजाराचे केवळ २९ रुग्ण आढळले.

Fever
Traffic Diversion | दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विशेष वाहतूक बदल; सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी

ध्वजारोहणामुळे 'डेथ ऑडिट' लांबले

डेंग्यूसदृश आजारामुळे दोन संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. अंबड लिंक रोड परिसरातील विनोद लखीराम मंडैया (१७) या युवकाचा मृत्यू ऑक्टोबर महिन्यात झाला. त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये पाथर्डी परिसरातील युवतीचा मृत्यू डेंग्यूसदृश आजाराने झाला. या दोन्ही मृत्यूंचे डेथ ऑडिट अद्याप शिल्लक आहेत. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीरत प्रशासन व्यस्त असल्यामुळे डेथ ऑडिट रडवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.