

सिडको (नाशिक) : शासनाच्या एका आदेशाने सिडको कोट्यावधी रुपयांचे मालक झाले आहे. किमान सिडकोच्या घराचे जे जास्तीत जास्त ४० चौरस मीटर क्षेत्र आहे त्यावर तरी सदरचा दहा टक्के पैसे फ्री द्यावा, अशी मागणी नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१७ मध्ये एका आदेशान्वये महाराष्ट्रातील जनतेला/प्लॉट धारकाला/ज्यांच्या नावाने प्लॉट क्षेत्र असेल अशा व्यक्तींना बेसिक वाढीव क्षेत्र म्हणून प्लॉटच्या दहा टक्के क्षेत्र जास्तीचे जाहीर केलेले आहे. त्याप्रमाणे एखाद्या प्लॉटचे क्षेत्र शंभर चौरस मीटर असेल तर ते या शासनाचे आदेशाने ११० चौरस मीटर समजले जाईल व त्यावर महापालिकेच्या नियमाप्रमाणे व एफएसआयप्रमाणे बांधकाम करता येईल. भूखंड ११० चौरस मीटर धरून त्यावर महापालिका वेगळा एफएसआय देईल, या शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्लॉट लाभ झालेला आहे. त्यात सिडकोसुद्धा आहे.
सिडकोकडे १००० एकर जागा असून त्यावर दहा टक्क्यांप्रमाणे एक्सेस लँड मिळणार आहे. ती जवळपास १०० एकर होती. आज १०० एकरचे चौरसमीटरप्रमाणे ४,८४, ००० इतके चौरस मीटर क्षेत्र होते. आजचा बाजार भाव 20 हजार रुपये चौरस मीटर असल्याने त्याची किमंत कोट्यावधी रुपये होते. सिडकोला ही मोठी लॉटरी २०१७ मध्ये लागलेली आहे. तरीही सिडको स्वतः मालक समजून सदर मिळणाऱ्या चटई क्षेत्राचा पूर्ण लाभ सिडको पदरात पडू इच्छिते. जे जे मोठे विकसक आहे त्यांना सदर क्षेत्र विक्री करायला सिडकोने सुरुवात केलेली आहे. त्यातूनही सिडकोला मोठे उत्पन्न मिळणार आहे. सिडको महामंडळाने जनतेचाही विचार करावा व त्यांनाही या बेसिक चटई क्षेत्र ,शासकीय योजनेचा काही लाभ मिळेल अशी तरतूद करावी. तसेच किमान सिडकोच्या घराचे जे जास्तीत जास्त ४० चौरस मीटर क्षेत्र आहे त्यावर तरी सदरचा दहा टक्के पैसे फ्री द्यावा, अशी मागणी नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश पवार, धनंजय बुचडे, दशरथ गांगुर्डे, वसंतराव सोनवणे, नंदन खरे, अण्णा तांबे, समाधान शेवाळे, राहुल भापकर आदींनी केली आहे.
सिडकोत सर्वसामान्य नागरिक राहतात. सिडको प्रशासनाने अल्पशी रक्कम आकारून सिडको फ्रि होल्ड केले पाहीजे .
भाग्यश्री ढोमसे, माजी नगरसेविका
सिडकोच्या घराचे जे जास्तीत जास्त ४० चौरस मीटर क्षेत्र आहे. सिडको प्रशासनाने त्यावर दहा टक्के पैसे फ्री द्यावा.
श्रद्धा सुयश पाटील, रहिवाशी