Nashik Minor Girl Kidnapping | अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Nashik Minor Girl Kidnapping | तरुणाने बनविल्या अश्लील चित्रफिती, छायाचित्रे
Girls Kidnapping
Girls KidnappingPudhari
Published on
Updated on

सिडको : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच तिच्याकडून अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती तयार करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सो आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girls Kidnapping
Online Life Certificate Pensioners | हयातीचा दाखला आता ऑनलाइन; पेन्शनधारकांना दिलासा

याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सायन सुकांत घोष (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) याने अल्पवयीन मुलीशी संपर्क साधून तिला फूस लावली. संबंधित मुलगी घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात आढळून आली.

कुटुंबीयांनी तिला घरी आणून विचारपूस केली असता आरोपीने तिला रेल्वेने प्रवास करून इटारसी येथे येण्यास सांगितल्याचे तिने सांगितले. तसेच त्र्यंबक रोडलगत असलेल्या एका हॉटेल परिसरातून आरोपीने मुलीला विविध आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.. तिच्याकडून अश्लील छायाचित्रे व चित्रफिती तयार करून ते पाठविण्यास भाग पाडल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news