Nashik News : सिडकोत कर्तव्यावर असताना होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

अंबड पोलीस ठाण्यातील घटना
Nashik News
सिडकोत कर्तव्यावर असताना होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू
Published on
Updated on

सिडको : सिडकोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बंदोबस्तासाठी जात असताना होमगार्डचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१६) सायंकाळी अंबड पोलीस ठाण्यात घडली.

होमगार्ड संतोष त्र्यंबक शेलार (वय ४१, रा. शिवपुरी चौक) यांना सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. पोलीस ठाण्याच्या आवारातच ते कोसळले. सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी मोरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news