

नाशिक : पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी त्याला बळजबरी पाण्यात घेऊन गेलेल्या चौघांविरोधात नांदगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
सोमवारी (दि. 25) दुपारी हिरेनगरमध्ये ही घटना घडली. मच्छिंद्र सदाशिव केसकर (36) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा रवींद्र (19) याला पोहता येत नव्हते. त्यानंतर संशयित शुभम खेमनर, साईनाथ पल्हाळ, आप्पा पल्हाळ आणि शरद पल्हाळ यांनी नदीत पोहोण्यासाठी नेले होते. मात्र, खोल पाण्यात रवींद्रचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी तपास करून संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.