नाशिक: सिने स्टाईल पाठलाग करत दोघांकडून तीन गावठी कट्टे हस्तगत

नाशिकमध्ये पोलिसांनी दोन युवकांकडून ताब्यात घेतले तीन गावठी कट्टे
Gavathi pistol
गावठी कट्टा File Photo

लासलगाव (नाशिक) : शहरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतूस आणि शाईन मोटार सायकल असा एक लाख अडोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली. सिने स्टाईल पाठलाग करत विंचूर तीन पाटी येथून दोन बावीस वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लासलगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि.३०) पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटार सायकलने पहाटे अडीच ते पावणे तीन च्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना थांबवले असता त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांनी या दोघांचा पाठलाग करत त्यांना विंचूर त्रिफुली येथे त्यांना पकडले. यामध्ये अनिकेत कैलास मळेकर (२२, रा. धायरी,पुणे) आणि नामदेव रामभाऊ ठेबे (वय -२२) या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांकडे तीन देशी कट्टा आणि ९ जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली.

लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता, यापूर्वी त्याने शस्त्रे विकली काय? याची पोलिस कसून चौकशी करत आहेत. डीवायएसपी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि लासलगाव पोलीस अधिक पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news