

देवळाली कॅम्प (नाशिक) : दारणा नदीवर भगूर - पांढुर्ली मार्गावर भगूर येथे असलेला ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाला असून, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे संभाव्य अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता सिन्नर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाने कळविली आहे
भगूरनजीक दारणा नदीवर भगूर - पांढुर्ली रस्त्यावरील दगडी पुलावरून नाशिक - सिन्नर तालुक्यातील विविध गावांतील शेकडो अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. अनेक वर्षे उभ्या असलेल्या या पुलाची नुकतीच - २०२५ मध्ये सिन्नर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता अधिकारी यांनी तपासणी केली असता, पूल अवजड वाहतुकीसाठी कमकुवत असल्याचा अभिप्राय देऊन वाहतूक बंद केली आहे. याबाबत शासकीय प्रसिद्धी पत्रकात वाहतूक बंदचे आदेश असतानाही या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सर्रास सुरू आहे त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.