Nashik bribe News | तिघा लाचखोर अधिकाऱ्यांना ठोकल्या बेड्या

नाशिकमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश, तिघा अधिकाऱ्यांना बेड्या
Nashik Bribe News
Nashik bribe News file photo

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.५) जिल्ह्यातील तिघा लाचखोर अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या होत्या. या तिघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना तीन तर एकास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Summary

या तिघांनी स्विकारली लाच

  • येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस

  • भूसंपादन विभागातील जनार्दन भानुदास रहाटळ

  • महावितण विभागा उपकार्यकारी अभियंता किसन भीमराव कोपनर

तांडा, वस्ती सुधार योजनांतर्गत २०२२-२३ या वर्षाकरिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तींवर ठेकेदारांमार्फत झालेल्या विकासकांचे बिल मंजूर करून धनादेशावर सही करण्यासाठी बिलाच्या दोन टक्क्याप्रमाणे २० हजाराची लाच मागणाऱ्या येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यास लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. धस याला शनिवारी (दि.६) न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच भूसंपादनाचा ना हरकत दाखला देण्यासाठी सातशे रुपयांची लाच स्विकारताना जनार्दन भानुदास रहाटळ व पिंपळगाव बसवंत येथे कार्यरत महावितण विभागाचा उपकार्यकारी अभियंता किसन भीमराव कोपनर यास एक लाख रुपयांची लाच स्विकारताना अटक केली होती. या दोघांनाही न्यायालय हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news