Nashik Bribe News | कारागृहातील लाचखोर डॉक्टर जाळ्यात

बंदीवासातून मुक्त होण्यासाठी ‘फिट फॉर सर्टिफिकेट’ देताना डॉक्टर रंगेहाथ
Nashik Crime News
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. File News

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. डॉ. आबिद आबु अत्तार (४०) असे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२) हा वैद्यकीय अधिकारी आहे.

तक्रारदार यांचे मित्र नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. शासकीय नियमानुसार ६५ वर्षांपेक्षा जास्त वय आणि १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे, अशा कैद्यांना शासकीय समिती सोडत असते. मात्र या समितीस कैद्याचे ‘फिट फॉर सर्टिफिकेट’ची आवश्यकता असते. त्यासाठी डॉ. अत्तार व डॉ. खैरनार यांच्याकडे अर्ज केला असता दोघांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचला असता दाेघांनी शासकीय पंचासमोर तडजोड करीत तक्रारदाराकडून ४० ऐवजी ३० हजार रुपयांची लाच घेतली. त्यामुळे विभागाने दाेघांनाही रंगेहाथ पकडले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news