Nashik Bribe News | एक लाखांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता जाळ्यात

एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले
Nashik Bribe News
एक लाखांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता जाळ्यात
Published on
Updated on

नाशिक : व्यावसायिक वीजमीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. किसन भीमराव कोपनर (४४, रा. पार्क साइड, हनुमाननगर, पंचवटी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

काेपनर हे निफाड तालुक्यातील पिंपळगाव उपविभागात कार्यरत आहेत. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दुकानातील व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता कोपनर यांनी काढले. त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे गुरुवारी (दि.४) एक लाख रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर विभागाने सापळा रचला. त्यानुसार शुक्रवारी (दि.५) कोपनर यांनी पंचासमोर एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडले. त्यांच्याविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस नाईक गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news