Nashik Bribe News | लाच घेणारा विभागीय तांत्रिक अधिकारी जाळ्यात

10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
bribe case one arrested
लाच घेणारा विभागीय तांत्रिक अधिकारी जाळ्यात Pudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : बचत गट अध्यक्षाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर त्या आदेशाची प्रत देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना विभागीय तांत्रिक अधिकारी राजेंद्र भागवत केदारे (57) यांस लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांची वहिनी बचत गटाचे अध्यक्ष आहे. त्यांना जिल्हा पुरवठा विभाग नाशिक यांच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. मात्र यावर विभागीय आयुक्त कार्यालय येथे अपील सुरू होते. या अपिलाचा निकाल वहिनीच्या बचत गटाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे निकालाची प्रत घेण्यासाठी तक्रारदार हे केदारे यांच्याकडे गेले असता केदारे यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केदारे यांची तक्रार केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. मंगळवारी तक्रारदाराकडून तडजोड करून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना केदारे यांस लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news