Nashik Bribe News | दहा हजारांची लाच घेताना वनसंरक्षक जाळ्यात

वनसंरक्षक शिरीषकुमार सजन निरभवणे याच्यावर गुन्हा दाखल
Pune Bribe Casre
लाच प्रकरणात फलोत्पादन कृषी सहसंचालक संजय गुंजाळ निलंबितPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : जांभळाचे व सादडाच्या लाकडांनी भरलेले पिकअप वाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले असता, ते सोडविण्यासाठी सहायक वनसंरक्षक शिरीषकुमार सजन निरभवणे याच्यावर दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने या प्रकरणातील साक्षीदाराच्या शेतातील जांभळाचे व सादडाचे जुन्या वाळलेल्या झाडांची लाकडे पिकअपमधून (एमएच ०४ एएस ८०७७) गोंदे येथील पेपर मिल येथे विक्रीसाठी आणले असता, वनविभागाचे एसीएफ निरभवणे, वनपाल सुरेश चौधरी व कावेरी पाटील यांनी पिकअप पकडून मेरी-म्हसरूळ येथे गेल्या ३१ जानेवारी रोजी जमा केले होती. सदर वाहन मालासह सोडविण्यासाठी निरभवणे याने वनपाल सुरेश चौधरी याच्यामार्फत दोन हजार दंड व लाच म्हणून दहा हजारांची मागणी केली होती. पुढे तक्रारदाराने हा संपूर्ण प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कथन केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार चौधरी याच्याकडे दोन हजार रुपये दंडाची रक्कम आणि दहा हजारांची लाच सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर चौधरी यास पंचांसमक्ष निरभवणेला फोन करण्यास सांगून दहा हजार मिळाल्याचे कळविण्यात आले. निरभवणे यानेदेखील त्यास होकार देत गाडीची ऑर्डर घ्यायला पाठवून दे, असे फोनवर सांगितले. दरम्यान, फोनवरील या वार्तालापावरून चौधरी व निरभवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news