Nashik |बोराडी शिवारातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक

बोराडी शिवारातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक
Crime
Crimefile photo
Published on
Updated on

धुळे : शिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेने तिच्या नातेवाइकांनी अत्याचाराची माहिती दिल्यानंतर पोलिस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने हालचाली करून संबंधित आरोपीला अटक केली आहे.

Crime
Dwarka Nashik road | द्वारका-नाशिक रोड रस्ता रुंदीकरणासाठी २२० कोटी

बोराडी परिसरातील एका पाड्यात राहणाऱ्या संबंधित पीडितेला अजय सत्तरसिंग पावरा याने जिवे ठार करण्याचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. विशेष म्हणजे तिच्या परिवाराला देखील ठार मारण्याचा धाक दाखवल्याने संबंधित पीडिता घाबरली. याचाच फायदा घेऊन पावरा याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. अखेर पीडितेने तिच्या नातेवाइकांना ही माहिती सांगितली. नातेवाइकांनी शिरपूर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यावरून पावराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Onion price crash | कांदा 50 पैसे प्रतिकिलो, जिल्ह्यात कांदा मातिमोल

दरम्यान, या घटनेच्या गंभीरतेमुळे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित जाधव, सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे तसेच उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी संबंधित गावाला भेट देऊन घटनेची प्राथमिक चौकशी केली. तसेच आरोपीला तातडीने ताब्यात घेण्यात आले असून, कायदेशीर ई साक्ष नोंदवण्याची कार्यवाही करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news