Bhondu Ashok Kharat | भोंदू अशोक खरात पुन्हा नाशिकरोड कारागृहात

Bhondu Ashok Kharat | नाशिक पोलिस ताबा मागणार
Ashok Kharat court statement
भोंदू अशोक खरातPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिलांवरील अत्याचार आणि गंभीर आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमध्ये अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याची सिन्नर पोलिसांची कोठडी संपल्यानंतर मंगळवारी (दि.२) त्याची सायंकाळी पुन्हा नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खरातच्या पुढील चौकशीची आवश्यकता नसल्याचे ईडीने न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Ashok Kharat court statement
Nashik Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरातची पुन्हा रवानगी जेलमध्ये! शिर्डी पोलिसांची कडक कारवाई

ईडीची चौकशी संपल्यानंतर सिन्नर पोलिसांनी त्याचा तीन दिवस तपासासाठी ताबा घेतला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने १९ मे रोजी अशोक खरातला अटक केली होती. चौकशीत डिपॉझिट स्लिप जमा न करताच बोगस बँक खात्यांच्या माध्यमातून सुमारे २५ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे विविध तपास यंत्रणांकडून खरातच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, खरातची पत्नी तथा सहसंशयित कल्पना खरात गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती आहे. गेल्या आठ वर्षांत तिच्या विविध बँक खात्यांमधून सुमारे ७ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

Ashok Kharat court statement
Shirdi Fraud Case | नाशिकच्या भोंदूबाबाचे 'ईडी' कनेक्शन! प्रतिभा चाकणकरांची चौकशी; 2 कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा पेच

अहिल्यानगर येथील राहाता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला असून, सिन्नर येथील गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी तिने नाशिकरोड अतिरिक्त न्यायालयात धाव घेतली आहे. आर्थिक फसवणुकीचे दोन गुन्हे सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असून, या प्रकरणात खरातची चौकशी करण्यासाठी त्याचा ताबा मिळावा यासाठी सरकारवाडा पोलिस न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. एसआयटीने दाखल केलेल्या नऊ गुन्ह्यांनंतर शिर्डी पोलिस आणि त्यानंतर ईडी त्यानंतर सिन्नर पोलिसांकडे त्याचा ताबा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news