Nashik Bank Cash Theft Arrest | बँकेच्या रोकडची विल्हेवाट लावणारे दोन रोजंदारी कर्मचारी अटकेत; अंबड पोलिसांची धडक कारवाई

Nashik Bank Cash Theft Arrest | संशयितांकडून 14 लाखांच्या रोकडसह चार मोबाईल हस्तगत
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

सिडको (पुढारी वृत्तसेवा):

बँकेच्या दैनंदिन कामकाजासाठी सोबत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनीच विश्वासघात करत १४ लाख ५० हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचा छडा लावत अंबड पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून १४ लाख ५०० रुपयांची रोकड आणि ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल असा एकूण १४ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली.

Arrested
Water Supply Scheme : शहराला आता तीन ते चार दिवसांआड पाणी १८ जलकुंभ कार्यान्वित : सिडको-हडकोत वितरणाला वेग

युनियन बँक ऑफ इंडिया, नाशिक शहर शाखेशी संबंधित वैभव विश्वनाथ डोळे (४४, रा. गंगापूर रोड, नाशिक) यांनी या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागातून बँकेच्या कामासाठी नेण्यात येणारी रोकड दैनंदिन रोजगारावरील सुरेश सोनकांबळे आणि अनुप कुमावत यांनी संगनमताने लांबवली. दोन्ही आरोपींनी रोकड घेऊन पोबारा केल्याचे तक्रारीत नमूद होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Arrested
Chhatrapati Sambhajinagar theft : एकाच रात्री चार बंद घरे फोडली; सिडको वाळूज महानगरातील घटना

सोनेकांबळेवर आधीच होता गुन्हा

दोनही संशयित ठाणे येथे गेले, तिथून नांदेड, शेगाव, छत्रपती संभाजीनगर, तुळजापुर, गाणगापूरमार्गे ठाणे येथे आले. मोबाईल बंद ठेवून पोलिसांना चकवा देत होते. ठाणे येथे कुटुंबासाठी रूम घेतली व दोघांनी त्यांच्यासाठी वेगळी रूम घेतली होती. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ठाणे येथून अटक केली.

संशयित सोनकांबळेवर २००७ मध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यात दरोड्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या कसून तपासानंतर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अंबड पोलीस पथकाने ही धडक कारवाई केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी अंबड पोलीस पथकाला १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.