Nashik | देवळाली मालधक्का शेडमधून ऑटोमोबाईल लोडिंग

Central Railway : स्थानकाला १२ कोटींचे उत्पन्न; नाशिकरोडवरील ताण हलका
automobile (vehicle) loading
Deolali Railway StationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : मध्य रेल्वे भुसावळ विभागामार्फत देवळाली रेल्वे स्टेशनवर मालधक्का येथे ऑटोमोबाईल (वाहने) लोडिंगसाठी सर्मपित गुडस‌ शेड उभारण्यात आली आहे. गट- 1 श्रेणीमधील मालधक्यावरुन महिन्या काठी 12 हून अधिक रेक माल हाताळला जात आहे. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथील ऑटोमोबाईल लाेडिंग व अनलोडींगचा ताण कमी झाला आहे. (A dedicated goods shed for automobile (vehicle) loading has been set up at Maldhakka at Deolali Railway Station)

नाशिकरोड मालधक्का येथील गुडस‌ शेडमधून फेब्रुवारी ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण 452 रेक (313 आवक व 139 जावक) हाताळण्यात आल्या. म्हणजेच महिन्याकाठी सरासरी 58 रेक हाताळल्या गेल्या. या माध्यमातून ऑटोमोबाईल उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून करण्यात आला. पण, याठिकाणी रेक वाहतूकीची गर्दी वाढली. त्यामूळे मध्य रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत (Amrit Bharat Station Scheme) देवळाली येथे ऑटोमाेबाईल वाहतूकीसाठी सर्मपित शेड गुडस‌ उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प मार्गी लावताना त्यामध्ये एनएमजी रेकच्या जलद तपासणीला प्राधान्य देण्यात आले.

देवळाली गुडस‌ शेडमधून ऑक्टोबरमध्ये एकाच महिन्यात विक्रमी 24 रेक लोड करण्यात आल्या. या विक्रमी लोडींगसह गुडस‌ शेडद्वारे ऑक्टोबर अखेरपर्यंत एकुण 95 रेक लोड झाले. त्यामूळे मासिक सरासरी ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये जवळपास 118 टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षीशी तुलना केल्यास 5.5 रेक प्रतिमाहवरून चालुवर्षी रेक लोडींगचे प्रमाण बारावर पोहचले आहे. परिणामी देवळाली रेल्वे स्थानकाला महसुल निर्मितीसाठी एक नविन पर्याय निर्माण झाला आहे. स्थानकाला ऑटोमोबाईलच्या लोडिंगमधून 12.06 कोटींची उत्पन्न प्राप्त करण्यात यश लाभले.

२९.९५ कोटीचे उत्पन्न

नाशिकरोड आणि देवळाली या दोन्ही स्थानकांवरील गुडस‌ शेडच्या एकत्रित लोडिंगमध्ये 7.83 टक्के वाढ झाली आहे. ज्यामुळे 2023 मध्ये 217 रेकच्या संख्येत वाढ होऊन यंदा हे प्रमाण 234 रेकवर पोहचले आहे. या वाढीमुळे दोन्ही स्थानकांना ऑटोमोबाईल लोडिंग ऑपरेशन्सद्वारे 29.95 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षाशी तुलना केल्यास महसुलात 31.75 कोटींची प्रभावी वाढ झाली आहे.

अमृत भारत स्टेशनतंर्गत (Amrit Bharat Station Scheme) देवळालीचा विकास तसेच पर्यायी वस्तू शेडच्या रुपात मालधक्का गुडस‌ शेड विकसिस करण्यात आले. त्यामूळे विभागातील ऑटोमोबाईल लोडिंग वाढले आहे. देवळाली स्थानकाने अमृत भारत स्टेशनचे उत्कृष्टता व महसूल उत्पन्न ही दोन्ही केंद्रे म्हणून निकष पूर्ण केले आहेत.

इती पांडे, डीआरएम, भुसावळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news