

नाशिक : शेकडो मोटारसायकलस्वार युवक आणि असंख्य महिला कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक ७ चा परिसर दणाणून सोडला. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी १५० हून अधिक दुचाकी वाहने सहभागी झाली होती. कमळ चिन्हाने सजवलेल्या प्रचाररथावर प्रा. फरांदे यांच्यासह संयोजिका व भाजप नेत्या स्वाती भामरे, हिमगौरी आडके, माजी नगरसेवक योगेश हिरे, गोपाल राजपूत, निक्की पवार, मंडल अध्यक्ष वसंत उशीर, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय गांगुर्डे आदी उपस्थित होते.
अशोकस्तंभ येथे नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या ढोल्या गणपती मंदिरात बाप्पांचे दर्शन घेऊन प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला. प्रभाग ७ मधील रॉकेल गल्ली, घारपुरे घाट, पोलिस हेड क्वार्टर, जुनी व नवीन पंडित कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, धनवटे कॉलनी, मुरकुटे कॉलनी, बाल गणेश मंदिर येथे रॅली आल्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते व सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. नंतर मॅरेथॉन चौक, जुना गंगापूर नाका, मारुती मंदिर, सप्तशृंगी कॉलनी, विघ्नेश्वर मंदिर, कुसुमाग्रज स्मारक या भागांत रॅली मार्गस्थ झाली. पुढे श्रीरंगनगर, गोकुळवाडी, तिरुपती टाउन, आनंदनगर, अयोध्या कॉलनी, अथर्व मंगल कार्यालय, विश्वास बँक परिसर, मधुर स्वीट्स, कर्मवीर बाबूराव ठाकरे चौक, थत्तेनगर, योगविद्याधाम, बीवायके कॉलेज चौक, पाटील लेन क्रमांक ३ व ४, लक्ष्मीनगर, सागर स्वीट्सजवळ आल्यावर प्रचारफेरीचा समारोप करण्यात आला.