Nashik Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरातच्या 'उलट्या बोंबा'

मी काही चुकीचे केलेच नाही; चौकशीत धक्कादायक उत्तर
 Ashok Kharat Case
Ashok Kharat Case
Published on
Updated on

नाशिक : महिला लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याने एसआयटी चौकशीत दिलेल्या उत्तरामुळे तपास यंत्रणा अवाक झाली आहे. 'मी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही, जे काही केले ते विधीचा भाग होता आणि त्यासाठी संबंधित महिलांची संमती होती, असे वक्तव्य त्याने केल्याची माहिती समोर आली आहे.' या उत्तरामुळे तपास यंत्रणांसमोर नवे प्रश्न निर्माण झाले असून, आरोपीची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक खरात याने धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. मात्र, स्वतःवरील आरोप नाकारत त्याने दिलेले स्पष्टीकरण 'चोरावर मोर' अशा प्रकारचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात त्याची सखोल चौकशी सुरू असून, विविध पैलूंवर तपास यंत्रणा काम करत आहेत.

 Ashok Kharat Case
Ashok Kharat Case | भोंदू खरातचा 'पापघडा' भरला! 500 हून अधिक महिलांचे शोषण; आता आयकर अन् जीएसटीचाही बडगा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शंभरहून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या महिलांमध्ये नाशिक, अहिल्यानगर, शिर्डी, मुंबई आणि पुणे या भागांतील महिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट होत आहे.

 Ashok Kharat Case
Ashok Khart Case : लग्न करण्याचे आमिष दाखवत खरातने केले विवाहितेचे लैंगिक शोषण : संबधित पिडीता गर्भवती!

दरम्यान, एसआयटीकडून पीडित महिलांचे जबाब, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्यभर या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news