Nashik APMC News | बनावट पावती पुस्तक प्रकरणाला नवीन वळण, महिला कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

नेमकं काय आहे प्रकरण?
Nashik Market Committee
अपहारप्रकरणी महिला कर्मचारी ताब्यातfile photo
Published on
Updated on

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्यात ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन त्यानंतर सचिव अरुण काळे यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन दुसऱ्यांदा तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या प्रकरणाचे पाय आणखी खोलात जात असून, पोलिसांनी बाजार समितीतील छपाई विभागातील महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून तसेच पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करून संस्थेच्या दप्तरात फेरफार करून त्याद्वारे एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहारप्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव प्रकाश घोलप यांनी सुनील जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयित सुनील जाधव यांनी प्रथम नाशिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यावेळी जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रक्रियेत उच्च न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली होती. तसेच या गुन्ह्यात तत्कालीन सचिव संशयित अरुण काळे यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्य न करणे, न्यायालयात तारखेस वेळीच हजर न राहणे, न्यायालयात मागितलेले कागदपत्रे सादर न करणे, वेळोवेळी आदेश देऊन देखील त्याचे पालन न करणे या कारणाहून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार (दि. ५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तीही मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करून बुधवार (दि. ७)पर्यंत पोलिस कोठडी वाढविण्यात आली होती. आता महिला कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर यात आणखी किती लोकांचा व कुणाचा नंबर लागतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Nashik Market Committee
Cross Voting Case : आमदार खोसकरांच्या उमेदवारीवर संक्रांत

आणखी मासे हाती लागण्याची शक्यता

बाजार समितीतील बाजार फी वसुलीच्या बनावट पावती पुस्तकप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बाजार समितीचा कर्मचारी सुनील जाधव, तत्कालीन सचिव संशयित अरुण काळे आणि आता छपाई विभागातील महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतल्याने आत्तापर्यंत तीन छोटे मासे पोलिसांच्या गळाला लागले असून, पुढील तपासात मोठे मासे हाती लागण्याची शक्यता असून, आणखी किती मासे गळायला लागतात की गळ सोडून पळतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news