Anant Kanhere Ground | मैदान सुशोभीकरणावर कोट्यवधी खर्च, तरीही नागरिकांची गैरसोय

Anant Kanhere Ground | शहरातील व्यायामप्रेमी, आबालवृद्ध आणि खेळाडूंचे आवडते ठिकाण असलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Anant Kanhere Ground
Anant Kanhere Ground
Published on: 
Updated on: 

नाशिक : अंजली राऊत

शहरातील व्यायामप्रेमी, आबालवृद्ध आणि खेळाडूंचे आवडते ठिकाण असलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मैदान सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात अनेक समस्या कायम असल्यामुळे जॉगर्समध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Anant Kanhere Ground
Hostel Girls Harassment | हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवून धमकी; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जॉगर्स क्लबचे अध्यक्ष दीपक भोसले, माजी अध्यक्ष कृष्णा नागरे, अभय छल्लानी आणि नंदू देसाई आदींनी महापौर हिमगौरी आहेर - आडके यांना निवेदन दिले. मैदानातील वॉकिंग ट्रॅकची दुरवस्था झालेली असून, मुलांकरिता उभारण्यात आलेल्या खेळणी तुटल्या आहेत. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे निसरडेपणा होऊन जॉगिंग करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मैदानाच्या कानाकोपऱ्यात पालापाचोळ्याचे ढिगारे साचले असून, ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी ठेवलेले डस्टबिनही पूर्ण भरलेले असतात. त्यामुळे फेरफटका मारताना तीव्र दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ईदगाह मशिदीमागील बाजूसही मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे डासांची उत्पत्ती आणि डेंग्यूचा धोका वाढण्याची संभाव्य शक्यता आहे.

मैदानातील पिण्याच्या पाण्याचे वॉटर रिफिल यंत्र बंद असून, स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बसण्यासाठी असलेल्या कट्ट्यांची दुरवस्था झाली असून, बाकड्यांचे कठडेही तुटले आहेत.

मैदानातील दिवाबत्ती, सुरक्षाव्यवस्था आणि बैठकीच्या सुविधांचाही प्रश्न कायम आहे. झाडांच्या संरक्षणासाठी कवच, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्ट्यांवर डोम तसेच रात्रीच्या सरावासाठी हायमास्ट फ्लडलाइट्स आणि अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

मैदानावर फ्लडलाइट्सचे पोल उभारणार

हुतात्मा अनंत कान्हेरे क्रिकेट मैदानावर आता आधुनिक फ्लडलाइट्सची सुविधा उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीने याबाबत नुकताच घेतलेल्या निर्णयानुसार, येत्या काही महिन्यांत मैदानावर फ्लडलाइट्सचे पोल उभारण्यात येणार आहेत.

त्यामुळे नवोदित क्रिकेटपटूंना रात्रीच्या वेळीही सराव करता येणार असून, त्यांच्या खेळाला अधिक प्रोत्साहन मिळणार असले, तरी प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.

Anant Kanhere Ground
Hostel Girls Harassment | हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवून धमकी; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

सीएसआरमधून उभारलेले जलकेंद्र बंद; नागरिकांची गैरसोय

अनंत कान्हेरे मैदान येथे आशा प्रकाश माहेश्वरी यांच्या स्मरणार्थ सीएसआर निधीतून उभारण्यात आलेले वॉटर रिफिल स्टेशन (पिण्याच्या पाण्याचे केंद्र) अनेक महिन्यांपासून बंदच आहे.

ई-टॉयलेटची सुविधा करणार

अनंत कान्हेरे मैदानावर येणाऱ्या नागरिकांसाठी लवकरच नूतन ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'पे अँड यूज' तत्त्वावर ही सुविधा कार्यान्वित होणार आहे तसेच टॉयलेटच्या बाजूलाच चेंजिंग रूमची उभारणी करण्यात येत असून, त्यामुळे मैदानावर येणाऱ्या नागरिकांची विशेषतः खेळाडूंची सोय होणार आहे. मात्र हे कामदेखील अतिशय संथगतीने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.