Nashik Airport | नाशिक विमानतळ नवीन धावपट्टीला शासनाची मंजुरी

‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स' करणार 200 कोटींची गुंतवणूक; माजी मंत्री भुजबळांचे प्रयत्न
Nashik Airport
नाशिकचे हवाईसेवा कमाईत 'टेकऑफ' File Photo
Published on
Updated on

नाशिक : नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टीस मंजुरी मिळाली असून विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला असून, या धावपट्टीसाठी २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे नाशिक विमानतळाच्या विकासास गती मिळणार असून, नाशिकमध्ये हवाई वाहतुकीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले होते.

भुजबळ यांनी १६ जुलै २०२४ व २१ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणी सुविधेसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू करणे शक्य झाले आहे. या निर्णयामुळे भुजबळ यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

भुजबळ यांच्या मागणीनुसार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने या नवीन धावपट्टीनिर्मितीसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नाशिक शहराची भविष्यातील गरज पाहता, विमानतळाची उड्डाणक्षमता अधिक वाढणार आहे. या निर्णयानंतर नवीन धावपट्टीचे आरेखन व इतर तांत्रिक बाबींसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित एजन्सीकडून तांत्रिक सर्वेक्षण सुरू केले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर धावपट्टी तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण होताच ही धावपट्टी तयार करण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवली जाईल. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अशी असणार धावपट्टी

नवीन धावपट्टीचे काम पूर्ण होण्यास साधारणतः २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. नवीन धावपट्टी ही सध्याच्या धावपट्टीप्रमाणेच ३ किलोमीटर लांब व ४५ मीटर रुंद असणार आहे. २०२२ साली धावपट्टीची डागडुजी सुरू असताना १४ दिवस नाशिकचे विमानतळ ठप्प झाले होते. नवीन धावपट्टीनिर्मितीनंतर डागडुजी सुरू असतानाही विमानतळ सक्रिय ठेवणे शक्य होणार आहे. तसेच हे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक देश विदेशातील हवाई नकाशावर जोडले जाणार असून नाशिकच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news