

नाशिक : येथील सिंंहस्थ कुंभमेळा सुरु होण्यास अद्याप अवकाश आहे. त्यापूर्वीच सोमवारी (दि.९) ओझर येथील विमानतळावर प्रवाशांच्या आवागमणाचा उच्चांक पाहायला मिळाला. विमानतळावरुन हवाई सेवा सुरु झाल्यानंतर आठ वर्षात प्रथमच ५ विमानसेवेतून १, ३३४ प्रवाशांनी शहरात आवागमन केले.
ओझर येथील विमानतळावररुन हवाई सेवेला २०१८ पासून प्रारंभ झाला. विविध कारणांनी सतत चर्चेत राहिलेल्या या विमानतळावरुन अनेक शहरांसाठी विमान सेवा सुरु झाल्या आणि कालांतराने त्याला प्रवासी मिळत नाही हे कारण देऊन बंदही झाल्या. या विमानतळावर नाईट लॅण्डिंगची सुविधा साडेपाचवर्षांपूर्वी देण्यात आली त्यासाठी उत्तम आणि आधुनिक लाईट व्यवस्थाही केली गेली. मात्र ती सुरु होऊ शकली नाही. वास्तविक मुंबईपासून जवळचे ठिकाण आणि मुंबई विमानतळावर लॅण्डिंगसाठी करावी लागणारी प्रतिक्षा बघता नाशिक हा नाईट लॅण्डींगसाठी उत्तम पर्याय होता. असे असूनही एकही विमान रात्री या विमानतळावर येत नाही. इतकी प्रतिकूलता असूनही ओझर येथील विमानतळावर सोमवारी नाशिकच्या विमानतळ इतिहासात नोंद व्हावी, असा प्रवाशी उच्चांक झाला. सोमवारी (दि.९) दिवसभरात अन्य शहरातून ८७३ प्रवाशी नाशिकमध्ये उतरले तर ६२१ प्रवाशांनी नाशिकमधून अन्य शहरांसाठी उडाण केले. एकूण १ हजार ३३४ प्रवाशांनी या विमानावरुन आवागमन केले. हा उच्चांक छठला आहे.
नाशिकमधून ५ ठिकाणी हवाई सेवा सुरु आहे. त्यात दिल्ली, हैद्राबाद, जयपूर, गोवा आणि बंगळुरू या शहरांमध्ये विमानसेवेला प्रतिसाद मिळतो. नागपूर सेवेला मिळणारा अल्प प्रवासी प्रतिसादामुळे ती नुकतिच बंद करण्यात आली. नाशिक-आयोध्या सेवेलाही लवकरच सुरुवात होणार आहे.
विमानांची संख्या-५
नाशिकला आलेले प्रवासी- 673
नाशिकहून बाहेर गेलेेले प्रवासी 661
एकूण : 1334
दिल्ली आणि बंगळुरू या विमानतळावरुन प्रवासी देश तसेच विदेशातील अन्य शहरात जाऊ शकतात. त्यामुळे या शहरात जाणाऱ्याची संख्या वाढलेली आहे. शिवाय उन्हाळी सुट्या संपलेल्या असल्याने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर हवाई विमानसेवेतून प्रवास केला.
दत्ता भालेराव. पर्यटन अभ्यासक