नाशिक : युनियन पाठोपाठ वर्क्स कमिटीवरही कामगार पॅनलचेच वर्चस्व

वीस जागांवर विजय, स्टाफच्या 5 जागांवर प्रोग्रेसिव्ह, वैयक्तिक उमेदवार विजयी
देवळाली कॅम्प
देवळाली कॅम्प विजयी उमेदवारांसमवेत जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अविनाश देवरूखकर, बबन सैद, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, संतोष कटाळे, राजू जगताप.(छाया : सुधाकर गोडसे)

देवळाली कॅम्प: प्रेस मजदूर संघावर एकतर्फी विजय मिळवणाऱ्या जगदीश गोडसे व ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या नेतृत्वाखालील कामगार पॅनलने वर्क्स कमिटीतही आपला दबदबा कायम ठेवताना 28 पैकी 20 जागा जिंकल्या तर आपला पॅनलला 4 व स्टाफच्या 5 पैकी 3 जागा प्रोग्रेसिव्हला तर 2 जागा वैयक्तिक उमेदवार विजयी झाले. निकालानंतर कामगार पॅनलच्या समर्थकांना सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड जल्लोष साजरा केला.

बारा वर्षापासून सत्तेवर असलेल्या कामगार पॅनलने या दोन्ही प्रेसमध्ये सलग पाचव्यांदा सत्ता मिळवून विक्रम केला आहे. कामगार पॅनलने इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) तसेच चलनी नोटा छापणाऱ्या नोट प्रेस (सीएनपी) मधील वर्क्स कमिटीच्या निवडणुकीतही विजय मिळवला. प्रेस मजदूर संघाबरोबरच वर्क्स कमिटीसाठी शनिवारी मतदान झाले होते.

देवळाली कॅम्प
देवळाली कॅम्प विजयी उमेदवार(छाया : सुधाकर गोडसे)

आयएसपीमधील विजयी उमेदवार असे...

मात्र, इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) मधील वर्क्स कमिटीच्या कामगार प्रतिनिधींच्या अकरा व स्टाफच्या तीन जागांसाठी आज मतमोजणी करण्यात आली. त्यात कामगार पॅनलचे बळवंत आरोटे (३८५), कैलास मुठाळ (४२१), राजेश चव्हाण (३५२), मनोज सोनवणे (३८०), किशोर गांगुर्डे (३५५) योगेश जाधव (३९९), भूषण मेढे (५२०), सोमनाथ काळे (३८०) तर आपला पॅनलचे सचिन तेजाळे (४२६), किरण गांगुर्डे (४९३), दामू ढोकणे (४४७) विजयी झाले. अधिकाऱ्यांच्या स्टाफच्या तीन जागांवर प्रोग्रेसिव्ह पॅनलचे पार्थ सरदार (९६), धीरज तिजारे (११८), मनीष गवई (१०५) विजयी झाले.

देवळाली कॅम्प
Nashik News | प्रेस मजदूर संघावर सलग पाचव्यांदा कामगार पॅनलची सत्ता

प्रेस नोटमधील विजयी उमेदवार असे...

नोट प्रेसमध्ये कामगार प्रतिनिधींच्या तेरा जागांसाठी निवडणुक झाली. विजयी उमेदवार - कामगार पॅनल- सुनील ढगे (३०८), संजय गरकळ (३०३), योगेश कुलवधे (४०७), अरूण चव्हाणके (४००), राजेंद्र काजळे (३४७), दिनेश कदम (३९०), विनोद घाडगे (३६४), बाळू ढेरिंगे (३३८), कचरू ताजनपुरे (३३९), अप्पाजी जगताप (३४६), प्रवीण निकुंभ (२९६), सुभाष ढोकणे (३६१). आपला पॅनल- अनिल जाधव (३२८). अधिकारी वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टाफच्या दोन जागांवर प्रोग्रेसिव्ह पॅनलचे सोनू सिंग (१०३), एस. माथूर (९७) विजयी झाले.

विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अविनाश देवरूखकर, बबन सैद, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, संतोष कटाळे, राजू जगताप, नंदू कदम, अण्णा सोनवणे आदी उपस्थित होते.

मजदूर संघाबरोबरच वर्क्स कमिटी ही अतिशय महत्त्वाची आहे. कामगारांनी या कमिटीमध्ये देखील कामगार पॅनलला स्पष्ट बहुमत दिले आहे. स्टाफच्या प्रतिनिधींसह सर्वांना सोबत घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहे.

जगदीश गोडसे, मजदूर संघ जनरल सेक्रेटरी, नाशिक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news