नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील निवृत्त सेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मविप्र रुग्णालयामध्ये औषधेवगळता वैद्यकीय खर्चामध्ये ५० टक्के सवलत दिली जात आहे. याबाबाबत संघाच्या मागणीवरून कार्यकारी मंडळाने ठराव केला आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली.
मविप्रच्या निवृत्त सेवक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ॲड. ठाकरे बोलत होते. संघाचे अध्यक्ष ॲड. उत्तमराव जाधव यांच्या आदींनी सभेसाठी योगदान दिले. अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेप्रसंगी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, डी. बी. मोगल, विश्वास मोरे, शालन सोनवणे, जगन्नाथ निंबाळकर आदी उपस्थित होते यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. अहवाल काळातील बेरीज, नफा-तोटा, ताळेबंद पत्रक, अंदाज पत्रक आदींवर चर्चा करून सभागृहात मंजूर करण्यात आले. सेवक संघाचे अध्यक्ष ॲड. यू. आर. जाधव यांनी मार्गदर्शन केले. माणिकराव गोडसे, एस. आर. पगार, एल. एस. तिडके, व्ही. पी. गोर्वधने, यू. एस. पाटील, हरिभाऊ ठाकरे, आर. एस. रोटे, प्रा. टी. बी. साळुंखे आदींनी सभेसाठी योगदान दिले.