Nashik | महापालिका पोखरणारे आमदारकीचे स्वप्न बघतात : ढिकले

Assembly Elections | नाशिक रोड येथील प्रचार कार्यालयाच्या उद‌्घाटनप्रसंगी टीका
Rahul Uttamrao Dhikale
नाशिक रोड येथील प्रचार कार्यालयाच्या उद‌्घाटनप्रसंगी डॉ. राहुल ढिकले यांच्यासह मान्यवर Pudhari
Published on
Updated on

नाशिक रोड : काही लोक राजकारणाचा अनुभव नसतानाही अती महत्त्वाकांक्षा दाखवत आहेत. चार- पाच वर्षे राजकारणात होत नाहीत, तोच पक्ष आपल्या मालकीचा समजून थेट आमदारकीचे स्वप्न बघतात, अशी टीका महायुतीचे उमेदवार ॲड राहुल ढिकले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश गिते यांचे नाव न घेता केली. स्थायी समिती ताब्यात असताना पालिका पोखरून खाल्ल्याचा पुरावा उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रातून उघड झाल्याचे नमूद करून, तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना निवडून देणार का असा सवालही ढिकले यांनी उपस्थित मतदारांना केला.

महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या नाशिक रोड येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 9) सायंकाळी बिटको चौक येथे शकुंतला करवा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ढिकले म्हणाले की, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दाखविलेला त्याग हा आदर्श असल्याचे सांगत गेल्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीतील लढाईला नकळतपणे उजाळा दिला. सत्तेत आलो, तर द्वारका ते दत्तमंदिर दरम्यानचा भारतमला योजने अंतर्गत मंजूर उड्डाणपूल मार्गी लावण्यासाठी सर्वात प्रथम प्राधान्य देऊ, रखडलेले नाट्यगृह पूर्णत्वास नेऊ असे आश्वासन यावेळी ढिकले यांनी दिले. याप्रसंगी बाळासाहेब सानप, शिवसेना उपनेते विजय करंजकर, रा. काँ. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संभाजी मोरुस्कर, बाजीराव भागवत, सूर्यकांत लवटे, संगीता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, अशोक तापडिया, मनोहर कोरडे, बाबूराव आढाव, रमेश धोंगडे, संजय भालेराव, विशाल संगमनेरे, शरद मोरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news