

सिडको (नाशिक) : अंबड परिसरात स्कूलबसच्या धडकेने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. गौरव तुकाराम कुऱ्हाडे (१९, रा. बजरंगवाडी, विल्होळी) हा दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीने जात असताना लक्ष्मीनगर येथे स्कूलबसची त्याला धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पक्षात आई ,बहिण, भाऊ असा परिवार असून गौरव खासगी कंपनीत नोकरीला होता.