

वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्यावजळ दुचाकी व पिकअप वाहनात झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी (दि.३) सप्तश्रृंगीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दुचाकीवरील तरुण भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप (एम.एच. 15 जे. डब्लू. 5717) व दुचाकी (एम.एच 15 HP 7342) यांच्यात समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीवरील अमोल भगवंत गवारी (२१, रा. वणी परिसर) हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेले अनिल सुखदेव गवारी (२५) व गोपी सुरेश गवारी (२०) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वणी प्राथमिक रुग्णालयात उपचार करून पिंपळगाव येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
गडावरून दर्शन घेऊन परतताना घटना
अमोल व त्याच्यासोबत असलेले अनिल व गोपी गवारी हे तिघे सप्तश्रृंगगडावरून दर्शन घेऊन दुचाकीने घरी परतत असताना अचानक समोर आलेल्या पिकअपशी त्यांच्या दुचाकीची धडक झाली. यात त्याच्या दुचाकीचा चुराडा झाला.