Nashik Accident Update | नवीन कसारा घाटात ट्रक दरीत कोसळला; दोन जण जागीच ठार

Kasara Ghat Accident : ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
इगतपुरी, नाशिक
नवीन कसारा घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळल्याने दोन जन जागीच ठार (छाया : वाल्मिक गवांदे)
Published on
Updated on

इगतपुरी (नाशिक) : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ सिमेंटने भरलेला ट्रक मुंबईकडे जात असतांना दरीत कोसळला. ही अपघाताची घटना शुक्रवार (दि.21) पहाटेच्या सुमारास घडली. ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. याअपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत.

अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून दरीत पूर्णपणे सिमेंट पसरले आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी व रूट पेट्रोलिंग टीम व कसारा शहापुर येथील आपत्ती टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु करून त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर कडून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात MH18 BG 9004 ह्या ट्रकचा चालक सौद अहमद अन्सारी (वय २८ रा. मालेगाव) व त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news