Nashik Accident News | कार उलटून एक ठार तर एक गंभीर

नातेवाइकांची भेट घेतल्यानंतर परत येताना अपघात, एक ठार
योगेश सुनील वाघ
योगेश सुनील वाघpudhari news network

सिन्नर : वावीकडून ओझरमार्गे दिंडोरीला जात असताना रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने कार उलटून झालेल्या अपघातात तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.3) रात्री ९.३० च्या सुमारास घडली. योगेश सुनील वाघ (24, रा. जानोरी, ता. दिंडोरी) हा मृत पावला असून मयूर गाडेकर (रा. गाडेकरवाडी, ओझर, ता. निफाड) हा गंभीर जखमी आहे

Summary

नातेवाइकांची भेट घेतल्यानंतर परत येत असताना हा अपघात घडला असून यामध्ये योगेश सुनील वाघ (24, रा. जानोरी, ता. दिंडोरी) मृत्यू झाला आहे. तर मयूर गाडेकर (रा. गाडेकरवाडी, ओझर, ता. निफाड) हा गंभीर जखमी आहे.

योगेश व मयूर हे कारने (एमएच 14, जीएच 5965) वावीजवळील नातेवाइकांकडे गेले होते. त्यानंतर ते दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे परतत असताना निमगाव- देवपूर शिवारात त्यांची कार उलटली. यात योगेश जागीच ठार झाला. तर मयूर गंभीर जखमी होता. नागरिकांनी त्याला उपचारासाठी सिन्नर येथे हलविले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान गुरुवारी (दि.४) मयुरला सिन्नर येथून हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक विजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सागर गिते व विनोद इप्पर पुढील तपास करीत आहेत.

मयुर गाडेकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर नाशिक, मुंबईनाका येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे त्यांचे कुटुंब मानसिक तणावात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news