Nashik Accident: नाशिकमध्ये एसटी बसचा अपघात, 7 प्रवाशांची प्रकृती गंभीर: समोरील वाहनाला वाचवताना बस झाडावर आदळली

उमराणे येथील उड्डाणपुलावरून उतरत असताना चालकाचा ताबा सुटलेली बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली.
Nashik Accident: नाशिकमध्ये एसटी बसचा अपघात, 7 प्रवाशांची प्रकृती गंभीर: समोरील वाहनाला वाचवताना बस झाडावर आदळली
Published on
Updated on

देवळा : बुधवारची दुपार... मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची नेहमीची वर्दळ... पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नाशिकहून मालेगावकडे निघालेल्या एका एसटी बसचा भीषण अपघात झाला. उमराणे येथील उड्डाणपुलावरून उतरत असताना चालकाचा ताबा सुटलेली बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील तब्बल २८ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

थरारक अपघात : नेमकं काय घडलं?

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुरमाड डेपोची एसटी बस (क्र. एमएच-१४ एमएच-०४८३) वेगाने मालेगावकडे जात होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस चालकाने आपल्या पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी समोरून एक छोटा टेम्पो वाहन आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने बस वेगाने वळवली, पण हाच निर्णय जीवघेणा ठरला.

Nashik Accident: नाशिकमध्ये एसटी बसचा अपघात, 7 प्रवाशांची प्रकृती गंभीर: समोरील वाहनाला वाचवताना बस झाडावर आदळली
Money Laundering Scam | मनी लॉण्डरिंगची भिती दाखवत दीड कोटींना गंडा

चालकाचा बसवरील ताबा पूर्णपणे सुटला आणि क्षणार्धात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या भल्यामोठ्या झाडावर आदळली. धडकेचा वेग प्रचंड असल्याने बस जागेवरच पलटली. हा सर्व प्रकार इतक्या वेगाने घडला की प्रवाशांना काही समजण्याच्या आतच होत्याचे नव्हते झाले.

Nashik Accident: नाशिकमध्ये एसटी बसचा अपघात, 7 प्रवाशांची प्रकृती गंभीर: समोरील वाहनाला वाचवताना बस झाडावर आदळली
'Smart Street' Lighting : ‘स्मार्ट स्ट्रीट’ लायटिंगविरोधात 1.40 लाख तक्रारी

प्रवाशांचा आक्रोश आणि देवदूतांसारखी धावलेली मदत

बस उलटताच आतमध्ये प्रवाशांचा आक्रोश, किंकाळ्या आणि मदतीसाठीच्या आर्त हाका यांनी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य निर्माण झाले. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर झालेल्या या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि वाहनचालक देवदूतांसारखे मदतीसाठी धावून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बसच्या काचा फोडून आणि दरवाजा तोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना धीर देत त्यांनी बचावकार्याला वेग दिला.

प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस आणि सोमा कंपनीचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातात एकूण २८ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बजरंग रुग्णवाहिका आणि जे.के. रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक हळूहळू सुरळीत केली, अशी माहिती देण्यात आली आहे.

देवळा पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत असून, चालकाचा निष्काळजीपणा की अन्य काही तांत्रिक कारण, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे महामार्गावरील वाहनांचा वेग आणि सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news