नाशिक : काठे गल्ली परिसरात बसच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. ५) मध्यरात्री घडली.
राहुल ज्ञानेश्वर बेंडकुळे (२३, रा. शिवाजीवाडी, पाथर्डी रोड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुल हा त्याच्या दुचाकीवरून मध्यरात्री बनकर चौकाकडून नागजी सिग्नलच्या दिशेने जात होता. काठे गल्ली सिग्नल येथे आल्यानंतर एसटी बसने धडक दिल्याने राहुल गंभीर जखमी झाला. त्यास त्याच्या भावाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी राहुलचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.