नाशिक : विल्होळी गावाजवळ अपघातात २० वर्षीय युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.२१) दुपारी दीड वाजता घडली.
या अपघातात वेदांत महेश सोनवणे (२०, रा. जायभावे नगर, पाथर्डी शिवार) याचा मृत्यू झाला आहे. वेदांत हा त्याच्या दुचाकीवरून घरी येत होता. त्यावेळी विल्होळी गावासमोरील पुलावर समोरून येणाऱ्या वाहनचालकाने वाहन अचानक वळवले. त्यामुळे वेदांतला समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने वाहनांची धडक झाली. त्यात वाहनाचे चाक वेदांतच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.