

सिन्नर : तालुक्यातील हिवरगाव शिवारात दुचाकी अपघातात नुकतेच सैन्य दलातून निवृत्त झालेले सुदाम गाेविंद आव्हाड (36, रा. उद्याेगभवन, सिन्नर मुळ रा. चापडगाव ता. निफाड ) व त्यांच्या साेबत असलेले अनंत मनाेहर दराडे (33, रा. चापडगाव) या दाेघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.19) सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
आव्हाड काही वर्षांपासून सिन्नर येथे वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वीच ते सैन्यदलातून निवृत्त झाले हाेते. आव्हाड व दराडे हे सिन्नरहून दुचाकीने (एमएच १७ सीके ३१२६) चापडगावकडे जात हाेते. हिवरगाव शिवारातील पेट्राेलपंपाजवळ उत्तम राधाकिसन कातकाडे यांच्या घराजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने दाेघेही रस्त्यावर फेकले गेले. यात दाेघांनाही जबर मार लागल्याने ते जखमी झाले. स्थानिकांनी मदत करत त्यांना तत्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच दाेघांचीही मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक तेथून पसार झाला. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक राजू पाटील करत आहेत.