

येवला (नाशिक) : नाशिक- छत्रपती संभाजी नगर महामार्गावर फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवार (दि.29) रोजी घडली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार गंभीर जखमी झाले आहेत. सुरत येथून शिर्डी येथे साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे.
येवल्याच्या एरंडगाव रायते शिवारात नाशिक संभाजीनगर महामार्गावर हा अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकांचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्यूनर कार चार ते पाच वेळा पलटी मारुन दुभाजकावर जाऊन आढळल्याने या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. स्थानिकांनी तातडीने मदतीचा हात दिल्याने अपघातातल्या जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.