

सिन्नर (नाशिक): मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर पुढे जाणाऱ्या ट्रकला कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे जखमी झाले.
वैभव गाडेकर असे मृताचे नाव आहे. समृध्दी महामार्गावर वैजापूरकडून सित्ररच्या दिशेने ट्रक ( एमएच १६ बीए ५१३३) येत असताना चॅनल नंबर ५३६.७ मुंबई कॉरिडॉर परिसरात पाठीमागून वेगात आलेल्या कारने ( एमएच ०६, बीई १८८३) पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात कारमधील वैभव गाडेकर जागीच ठार झाला तर कार चालक सावन चव्हाण व सिंधू गाडेकर हे गंभीर जखमी झाले. वावी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.