

नाशिक : मूळ दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील प्राध्यापिकेचा अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रुक्मिणी वसंतराव उफाडे (35) असे या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या बुधवारी (दि. 25) अशोक स्तंभ परिसरात पायी जात असताना मागून आलेल्या फाइव्ह व्हीलरने त्यांना धडक दिली होती. त्यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी (दि. 28) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगी आहे. अतिशय हुशार, मनमिळावू आणि कर्तव्यतत्पर शिक्षिका म्हणून त्यांचा विद्यार्थ्यांमध्ये लौकिक होता.