

मालेगाव : चंदनपुरी रस्त्यावरील शेलारनगर शिवारात पुढे चालणार्या दुचाकीला मागून येणार्या दुचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.7) सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडला.
आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच 41, एसी 0926) भरधाव चालवत असताना पुढे चालणार्या दुचाकी (एमएच 15, एसी 5548) ला मागून धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या तेरसिंग उर्फ तोरस्या भुरला रावत (44, रा. धानोरा, ता. सेंधवा, जि. बरवाणी) यांना डोक्याला, पायाला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भीमा उर्फ डेमा भुरला रावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक पाटील अधिक तपास करीत आहेत.