Nashik Accident |ब्रेकींग ! नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अॅण्ड रन

अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या क्रेटाने पथकाच्या दोन कार उडवल्या, चालक ठार ; 3 कर्मचारी जखमी
Nashik Accident
अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकने पथकाची स्कार्पिओ कार उडवलीछाया : सुनिल थोरे

नाशिकमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबतच हिट अँड रनची घटना घडली आहे. परराज्यातील अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारचा (क्र.GJ 19DX 8886) सिनेस्टाईल पाठलाग सुरू असतांना मोठा अपघात घडला आहे.

चांदवड तालुक्यातील हरनुल टोल नाक्यावर पथकाच्या गाडीला अवैध वाहतुक करणाऱ्या कारने कट मारल्याने पथकाची स्कॉर्पिओ उलटली. स्कॉर्पिओ उलटून अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला, तर पथकातील ३ कर्मचारी गंभीर जखमी असून त्यात २ पोलिसांचा समावेश आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

घोटी ते नाशिक, नाशिक ते मनमाड, मनमाड ते चांदवड असा सव्वाशे किलोमीटरचा पथकाने सिनेस्टाईल क्रेटा कारचा पाठलाग केला. या दरम्यान अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उडवल्या असून त्यात एक सरकारी तर दुसरी खाजगी कार आहेत. घटना स्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक फौजफाट्यासह पोहचले असून अधिकचा तपास सुरू आहे.

एकाचा मृत्यू, 3 जखमी

सदर अपघातात जवान-नि-वाहन चालक कैलास गेनू कसबे यांचे जागीच मृत्यू झाला. जवान राहुल पवार व लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन कॉन्स्टेबल अरुण बाळासाहेब डोंगरे व शशिकांत देविदास निकम हे जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news