

देवळाली कॅम्प : नाशिक- पुणे राष्ट्रीय महार्गावरील चेहेडी येथे दोन दुचाकींच्या अपघातात सासरे व जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
महेश भारत नरवाडे (३५, रा. कारखाना रोड, पळसे) व त्याचे सासरे अनिल बाबूराव लाजरस (७१, रा. गोरेवाडी, नाशिक रोड) हे दुचाकी (एमएच १५, जीटी ८८३०) वरून पळसेकडून नाशिक रोडकडे जात असताना समोरून आलेल्या भरधाव थंडर स्पोर्ट दुचाकीने श्रमिकनगर, जुना चेहेडी नाका येथे समोरून आलेल्या सासरे- जावयाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात महेश नरवाडे व अनिल लाजरस दोघे जागीच ठार झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार थंडर स्पोर्टबाइकवरील दोन तरुण अत्यंत वेगात इतर गाड्यांना हुलकावणी देत जात होते. वेगवेगळे आवाज दुचाकीमधून काढत होते. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
महेश नरवाडे व त्यांची पत्नी येथील जयराम रुग्णालयात कामाला होते. येथे सासरे लाजरस हे मुलीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. दुपारी जावई व सासरे लाजरस हे जेवणासाठी पळसे येथील घरी जेवणासाठी गेले होते. जेवण करून परत येत असताना हा अपघात झाला.