Nashik Accident | सवंदगाव फाट्यावर पिकअप धडकेत पिता-पुत्र ठार

ऐन मोहरमच्या दिवशी काळाची झडप
Nashik Malegaon Accident
सवंदगाव फाट्यावर पिकअप धडकेत पिता-पुत्र ठारpudhari photo

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाट्यावर पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाले. बुधवारी (दि. १७) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

माजी नगरसेवक तथा शिक्षण मंडळाचे माजी सभापती शेख निसार शेख अकबर उर्फ राशनवाले (५५) व त्यांचा मुलगा शेख अबरार शेख निसार (२०) हे पिता-पुत्र नमाज पठणानंतर दुचाकीने सवंदगाव फाट्यावररून जात होते. त्यांना पाठीमागून भरधाव पिकअपने (एमएच ४८ सीबी ८६६३) धडक दिली. निसार यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी अबरारने वडिलांचा मोबाइल घेऊन कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर अबरारला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचाही मृत्यू झाला.

रोज पहाटे फजहरच्या नमाजनंतर दोघे पिता-पुत्र फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. बुधवारी ऐन मोहरमच्या दिवशी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अबरारला किडनीचा आजार असल्याने त्याला डायलिसिससाठी मुंबई, पुणे येथे न्यावे लागत होते. दोघांवर येथील बडा कब्रस्तानात दफनविधी पार पडला. यावेळी शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news