Nashik Accident : देवळा-मालेगाव रस्त्यावर कार-दुचाकीचा भीषण अपघात; दहिवडचे दोन जण जागीच ठार

कार-मोटारसायकलची समोरासमोर धडक; पिंपळगाव वळणावरील दुर्घटना
Nashik Accident : देवळा-मालेगाव रस्त्यावर कार-दुचाकीचा भीषण अपघात; दहिवडचे दोन जण जागीच ठार
Published on
Updated on

देवळा : देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) वळणावर शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अर्टिगा कार आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. देविदास पांडुरंग ठाकरे (वय २६) आणि कैलास पुंडलिक देवरे (वय ५५, दोघे रा. धोबीघाट, दहिवड, ता. देवळा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे दहिवड परिसरावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास देविदास ठाकरे व कैलास देवरे हे आपल्या हिरो मोटारसायकलने (क्र. MH-41-BS-3152) दहिवडकडून देवळ्याकडे येत होते. याच वेळी देवळ्याकडून दहिवडच्या दिशेने जाणाऱ्या मारुती अर्टिगा कारची (क्र. MH-04-HU-1283) आणि दुचाकीची पिंपळगाव (वा.) नजीकच्या फॉरेस्ट वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली.

वाहनांचा चक्काचूर

हा अपघात इतका भीषण होता की, यात मोटारसायकलचा पार चक्काचूर झाला व दुचाकीवरील दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. अर्टिगा कारच्या पुढील भागाचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news