Nashik | सेल्फी काढताना नाशिक रोडच्या तरुणाचा बुडून मृत्यू

सेल्फी तरुणाच्या जीवावर बेतली, पर्यटनाचा आनंद क्षणार्धात गमावला
drowned death
बुडून मृत्यूfile photo
खोडाळा (नाशिक) : दीपक गायकवाड

मध्य वैतरणा धरण प्रकल्पात फिरण्यासाठी आलेल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिकरोड परिसरातील आनंद पोपट गोतीसे यांचा प्रकल्पात पोहोत असताना सेल्फी घेत असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे तोल गेला यातच त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

सदर घटना रविवार (दि.३०) रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे. खबर मिळताच मोखाडा पोलिसांनी तातडीने धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शिकस्तीने प्रवाहातून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.

शनिवार व रविवार (दि. २९ व ३० जून) रोजी लागून आलेल्या सुट्टयांचा व पाण्यात भिजण्यासाठी आणि पोहोण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी हौशी तरुण पर्यटकांचा जथ्था दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मोखाडा तालुक्याकडे आकर्षित होतो. परंतु धोकादायक ठिकाणांचा अंदाज नसल्याने बऱ्याचशा पर्यटकांच्या सदरची घटना रविवार (दि.३०) रोजी रात्री ८ जीवावर बेतली आहे. अशाच प्रकारे वर्षाफेरीचा आनंद घेण्यासाठी नाशिकरोड परिसरातून मध्य वैतरणा प्रकल्प येथे केशव किसन मरकड, सचिन अशोक (आडनाव माहित नाही), राहुल रविंद्र जाधव, राहल गिते च आनंद पोपट गोतीसे हे तरुण आले होते. यातील राहुल गीतीसे व आनंद गोतीसे हे पाण्यात पोहताना सेल्फी काढण्यात व्यस्त होते. मात्र सल्फी काढत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असतांना सोबतच्या तरुणांनी राहुल जाधव याला सुखरूप बाहेर काढले. मात्र आनंद गिते हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

आनंद गोतीसे यांचे शव कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सावरखुट परिसरात वाहत जावून एका मोठ्या दगडाला अडकल्याने लगेच हाती लागले आहे. दगडाला अडकले नसते तर शव मिळणे कठीण झाले असते असे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. मध्य वैतरणा प्रकल्प मोखाडा तालुक्याच्या हद्दीत येतो. मात्र ही दुर्घटना कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तथापी घटनेची खबर मिळताच मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप गिते यांनी खोडाळा पोलिस दूर क्षेत्र येथील पोलिस हवालदार संजय बागूल व अंमलदार श्रीरंग शेळके यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. सावरखुट ग्रामपंचायत सदस्य अनंता कारे व ग्रामस्थ तसेच कारेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच हनुमंत फसाळे व ग्रामस्थ असा ५०/६० लोकांचा ताफा घेवून सावरखुट बाजूने एक तर कोचाळा भागातून एक अशा दोन टिम करुन अंधारात दगडधोंडपाची पर्वा न करता शोध मोहीम जारी केली. अत्यंत शिकस्तीचे प्रयत्न करून रात्री ११.३० वाजता आनंद गोतीसे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

या अनपेक्षित दु:खदायक प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन हौशी पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, आपण ज्या भागात वर्षासहलीचा उपभोग घेण्यासाठी येतो. त्या भागाची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेताना अशा पद्धतीने जीवाला धोका होणार नाही. याची खबरदारी पर्यटकांनी घ्यावी.

प्रदीप गीते, प्रभारी अधिकारी, मोखाडापोलीस ठाणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news