Narhari Zirwal : शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशील

मंत्री नरहरी झिरवाळ : वाघाड धरणावर जलपूजन; पाणी नियोजनाबाबत बैठक
दिंडोरी (नाशिक)
जानोरी :वाघाड धरण येथे जलपूजन करताना मंत्री नरहरी झिरवाळ समवेत खा. भास्कर भगरे, आ. दिलीप बनकर, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, वैभव भागवत, निलेश वन्नरे आदी. (छाया : समाधान पाटील)
Published on
Updated on

दिंडोरी (नाशिक) : विविध सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी पाण्यावरचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक फॉर्म भरावेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. मोहाडी पाणी वापर संस्थेच्या वतीने वाघाड धरण येथे जलपूजन करण्यात प्रसंगी ते बोलत होते. यानंतर पाणी नियोजन बैठक मंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

यावेळी खासदार भास्कर भगरे, आ. दिलीप बनकर, विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, वाघाड कालवा उपविभागीय अभियंता निलेश वन्नरे उपस्थित होते.

मंत्री झिरवाळ म्हणाले की, एकदरे धरणाच्या पाण्यामुळे पेठ व दिंडोरी तालुक्यातील अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तसेच नद्यांवरील साठवण बंधाऱ्यांचे निर्बंध उठविण्यासाठी प्रयत्न सुरू असून पाणी वाटप महासंघाने जागृत राहून शेतकऱ्यांना पाणी मिळवून द्यावे. पाण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुविधा निर्माण करण्यासाठी पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शिवार रस्ते विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिंडोरी (नाशिक)
Kadwa Sugarcane Factory : ‘कादवा’तर्फे उसाचा पहिला हप्ता 2,800 रुपये खात्यात वर्ग

यावेळी पाणी वापर महासंघाचे संचालक शहाजी सोमवंशी यांनी विविध समस्या मांडत, दरवर्षी आकारली जाणारी १० टक्के पाणीपट्टी वाढ अन्यायकारक असून रद्द करवी. २० टक्के लोकल फंडाचा प्रत्यक्ष फायदा पाणी वापर संस्थांना मिळावा अशी मागणी केली. खा. भगरे, आ. बनकर यांनी धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे काम अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी वाघाड पाणी वापर संस्था अध्यक्ष चंद्रकला वडजे, उपाध्यक्ष रामनाथ पिंगळ, संजय वाबळे, रघुनाथ कदम, शिवाजी पिंगळ, डॉ. पुंडलिक धात्रक, प्रभाकर आंबेकर, नवनाथ नाठे, पुंडलिक पाटील, सागर पगारे, संदीप उगले, माधव उगले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहाजी सोमवंशी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news