

नांदगाव ( नाशिक ) : नांदगाव पंचायत समितीच्या आठ गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यात आठपैकी तीन गण आरक्षित झाले आहेत, तर चार गण महिला राखीव झाल्याने येथील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सोमवारी (दि. १३) तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यात जातेगाव गण केवळ सर्वसाधारण असल्याने तेथे चुरस निर्माण होऊ शकते. साकोरा गटातील साकोरा व वेहेळगाव गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे राजकीय समीकरणेही बदलली, तर नवल वाटू नये.
गणनिहाय आरक्षण असे...
मांडवड : नामा प्रवर्ग, भालूर : अनुसूचित जाती, पानेवाडी : सर्वसाधारण महिला, जातेगाव : सर्वसाधारण, न्यायडोंगरी : सर्वसाधारण महिला, साकोरा : अनुसूचित जमाती महिला, वेहेळगाव : अनुसूचित जमाती, सावरगाव : नामा प्रवर्ग महिला
गटनिहाय आरक्षण
साकोरा : सर्वसाधारण महिला, न्यायडोंगरी : सर्वसाधारण, भालूर : सर्वसाधारण, जातेगाव : सर्वसाधारण महिला
निफाड : पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या निरीक्षणाखाली तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी १६ गणांचे आरक्षण निश्चित केले. एकूण १६ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात नांदुर्डी, उगाव, देवगाव यांसारख्या जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. लासलगाव अनुसूचित जाती महिला, कसबे सुकेणे व कोकणगाव अनुसूचित जमाती महिला तर पिंपळस आणि चांदोरी येथे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहेत. यावेळी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
गण निहाय आरक्षण
पालखेड : सर्वसाधारण, नांदुर्डी : सर्वसाधारण महिला, टाकळी विंचुर : सर्वसाधारण, लासलगाव : अनुसूचित जाती महिला, विंचुर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, डोंगरगाव : सर्वसाधारण, कोठुरे : अनुसूचित जमाती, उगाव : सर्वसाधारण महिला, कसबे सुकेणे : अनु.जमाती महिला, कोकणगाव : अनुसूचित जमाती महिला, पिंपळस : नागरिकांचा मागास प्रवर्ग, चांदोरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग, सायखेडा सर्वसाधारण, करंजगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नांदुरमध्यमेश्वर : सर्वसाधारण, देवगाव : सर्वसाधारण महिला.