नाशिक : जिल्ह्यातील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेच्या निवडणूकीमध्ये शुक्रवारी (दि. १२) मोठ्या प्रमाणावर माघारी नाट्य घडणार आहे. माघारीनंतर लगेचच पॅनलची निर्मिती होऊन चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे शुक्रवार पॅनलप्रमुखांसह इच्छुकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, पॅनलप्रमुखांची इच्छुकांच्या मनधरणीसाठी दिवसरात्र बैठका सुरु आहेत. त्याला कितपत यश येते हे माघारी नाट्यानंतरच समोर येईल. या निवडणूकीसाठी तीन पॅनल तर होणारच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गंगापूर रो़डवरील संस्थेच्या कार्यालयामध्ये माघारीसाठी शुक्रवारी ४ वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यानंतर पॅनलनिर्मिती आणि चिन्हवाटप केले जाणार आहे. या निवडणूकीसाठी माजी आमदार बाळासाहेब सानप, विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी सहचिटणीस तानाजी जायभावे यांचे प्रमुख पॅनल असण्याची शक्यता आहे. बाळासाहेब सानप यांच्या पॅनलमध्ये कोंडाजी आव्हाड, उदय घुगे तर विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या पॅनलमध्ये शिवाजी मानकर तसेच तानाजी जायभावे यांच्या पॅनलमध्ये हेमंत धात्रक, पी. आर. गीते यांचा समावेश आहे. तुर्तास तरी चौथ्या पॅनलची शक्यता कमी दिसत असली तरी एकंदरीतच इच्छुकांनी भरलेले अर्ज बघता वेळेवर अर्धा पॅनल होऊ शकतो.
दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी अवघ्या नऊ जागांची माघारी झाली आहे. माघारीसाठी दिवसभरात अनेक घडामो़डी घडणार असल्याने आपापल्या पॅनलने इच्छुकांसाठी वेगळी फिल्डींग लावली आहे.
संदीप कातकाडे (अध्यक्ष, सहचिटणीस), सुनील केदार (विश्वस्त, कार्यकारीणी सदस्य), सुनीता दराडे (महिला सदस्य), साहेबराव दराडे (कार्यकारी सदस्य), संजय सानप (कार्यकारीणी सदस्य)