Nagraj Manjule
Nagraj ManjulePudhari News network

Nagraj Manjule | नागराज मंजुळे यांना समता पुरस्कार

पुण्यातील फुले वाड्यात उद्या वितरण
Published on

नाशिक : महात्मा फुले पुण्यतिथिदिनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा 'समता पुरस्कार' यंदा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुवारी (दि. २८) सकाळी ९.३० वाजता पुण्यातील समताभूमी, फुले वाडा येथे आयोजित कार्यक्रमात समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहराध्यक्ष वैष्णवी सातव यांनी कळविली आहे.

या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनानिमित्त 'महात्मा फुले समता पुरस्कार' सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा. शरद यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. बी. एल. मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा. डॉ. मा. गो. माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, कै. प्रा. हरी नरके आदी दिग्गजांना समता पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.

यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली. मंजुळे यांचे नाव मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत अग्रक्रमाने घेतल जाते. त्यांना वास्तववादी लेखन, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या कार्यातून महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news