Nashik Nafed Onion Purchase |कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा; नाफेड आणि NCCF थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करणार!

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय, सोमवारपासून होणार खरेदी प्रक्रियेला सुरुवात
NAFED Onion Procurement
प्रतिकात्‍मक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on

NAFED Onion Procurement

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : 'नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (NAFED) आणि 'नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (NCCF) आता थेट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी करतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज (दि. ६) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर मान्‍य झाली आहे.

सोमवारपासून खरेदी प्रक्रियेला सुरुवात

कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन, नाफेड, एनसीसीएफ आणि बाजार समितीच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार आता सोमवारपासून (दि. ८)नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये ही थेट खरेदी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार आहे.

NAFED Onion Procurement
Maharashtra Onion Farmers Protest: पारनेरमध्ये कांदा लिलाव बंद; नाफेड दर निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप

प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर निश्चित

खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफकडून कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. थेट बाजार समित्यांमध्ये शासकीय यंत्रणांकडून खरेदी सुरू होणार असल्याने खुल्या बाजारातील कांद्याचे दर सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास बैठकीनंतर लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.

NAFED Onion Procurement
Nashik Onion Price Drop | 'नाफेड'पेक्षा खुल्या बाजारात 400 रुपये जास्त भाव; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दौऱ्यात धक्कादायक वास्तव उघड

अखेर शेतकर्‍यांची प्रलंबित मागणी मान्‍य

गेल्या अनेक वर्षांपासून नाफेड आणि एनसीसीएफने थेट बाजार समित्यांमध्ये येऊन कांदा खरेदी करावा, अशी मागणी कांदा उत्‍पादक शेतकर्‍यांची होती. यामुळे व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीला लगाम बसेल आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, अशी मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जात होती. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची आणि त्यांना थेट दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news